मासिक पाळीमध्ये होतात प्रचंड वेदना? करा हे उपाय, पोटदुखी होईल कमी..

मासिक पाळीमध्ये वेदना होणे ही सामान्य बाब आहे. पण काही वेळा पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळे स्त्रियांना आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. तर काहींना बेडवरच राहावे लागते. मात्र काही घरगुती पदार्थांच्या मदतीने तुम्ही या वेदनांपासून सुटका मिळवू शकता.

आलं

आलं आपल्याला मासिक पाळीमध्ये खूप आराम देऊ शकते. आले प्रोस्टाग्लॅन्डिन्सची पातळी कमी करण्यास मदत करते, हे एक वेदनादायक संप्रेरक आहे.

आल्याला सुपरफूड म्हणतात कारण त्यामध्ये चांगल्या आरोग्यासाठी असलेले सर्व आवश्यक पौष्टिक घटक असतात. त्यात पोटॅशियम, मॅंगनीजआणि मॅग्नेशियम सार्खे घटक अस्तात

आल्याचा चहा

आपण दुधाचा चहा तर पितोच. जेव्हा आपण चहा बनवण्यासाठी पाणी आणि चहा उकळतो. तेव्हाच त्यात आलं टाकून ते देखील उकळा. नंतर यामध्ये दूध टाकून गरमा गरम आल्याचा चहा प्या...

आलं तुळशी हर्बल चहा

आल्याचे पातळ काप करा. मग एका पॅनमध्ये पाणी घ्या आणि ते घाला. त्यात तुळशीची पाने घाला. थोडावेळ उकळवा. अशाप्रकारे आलं आणि तुळशीचा हा हर्बल चहा तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनेतून आराम देईल.

आल्याचा काढा

आल्याचा काढा बनवण्यासाठी पातेल्यात 1 कप पाणी घाला. त्यात थोडे आले आणि ओवा घालून काही वेळ उकळवा. नंतर ते गाळून घ्या आणि थोडेसे कोमट असतानाच वापरा.

आल्याचे पाणी

कोमट पाण्यात आलं आणि मध घालून पिणे फायदेशीर ठरू शकते. एक कप पाण्यात थोडेसे आले किसून टाका आणि नंतर ते 10 मिनिटे उकळा. नंतर गॅस बंद करा आणि त्यात मध घाला. हे आल्याचे पाणी प्यायल्याने तुम्हाला मासिक पाळीच्या वेदनेपासून आराम मिळेल.

VIEW ALL

Read Next Story