संत्री हे सुपर फूड म्हणून ओळखले जाते. मात्र, काही विशिष्ट लोकांना संत्री खाणे त्रासदायक ठरू शकते.
संत्री खाणे आरोग्यासाठी फायद्याचे आहे. संत्री अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे. यामुळे त्वचा उजळते.
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी (Vitamin-C) मोठ्या प्रमाणात असते. यामुळे डिहायड्रेशनची समस्या दूर होते.
संत्री खाल्ल्यमुळे प्रतिकारशक्ती (Immunity)वाढते. मात्र, काही लोकांना संत्री खाण्याचा त्रास होवू शकतो.
ज्यांची पचनशक्ती कमजोर आहे त्यांनी संत्री खाणे टाळावे.
लहान मुलांनी जास्त संत्री खाल्ल्यास त्यांना पोटदुखीचा त्रास होवू शकतो.
हृदयरोगाचा त्रास असल्यास हिवाळ्यात संत्र्याचे सेवन कमी करावे किंवा टाळावे.
गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या महिलांना जास्त संत्री खाणे हानीकारक ठरु शकते.