आजच्या काळात बदलत्या जीवनशैली आणि खाण्याच्या सवयींमुळे हृदयविकाराचा धोका झपाट्याने वाढत आहे.
तणाव हे त्यामागचे कारण आहे. यामुळेच वृद्धांपेक्षा तरुण या आजाराला बळी पडत आहेत.
तज्ञांच्या मते, बहुतेक हृदयविकाराचा झटका आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच सोमवारी येतो. शनिवार आणि रविवारची सुटी संपल्यानंतर सोमवार हा पहिला कामाचा दिवस असतो.
ऑफिसमध्ये अनेक टार्गेटस् आणि कल्पना घेऊन जावे लागतात. यामुळे एखाद्या व्यक्तीचा तणाव वाढतो त्यामुळे हृदयावर दाब पडतो.
शनिवार रविवार सुट्टी असल्यास झोपण्याच्या वेळेत बदल झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी रक्तदाब आणि कोलेस्ट्रॅालची पातळी वाढते यामुळे हृदयविकाराचा धोकाही वाढतो.
एखादी व्यक्ती जास्त विचार करते किंवा तणाव घेते तेव्हा कोलेस्ट्रॅाल आणि रक्तातील साखरेची पातळी देखील वाढवते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानेही हृदयाचे नुकसान होते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)