मूगडाळ कुणी खाऊ नये? नुकसान एकदा व

आहारात सर्व प्रकारच्या डाळींचा समावेश असणं गरजेचं आहे.

डाळींमध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात. त्यातीलच एक म्हणजे मूग डाळ.

आपल्या दररोजच्या आहारात मुगडाळ हमखास खाल्ली जाते.

पण तुम्हाला माहितेय का मूग डाळ जास्त प्रमाणात खाल्यांन 'या' गंभीर समस्यांना तोंड द्यावं लागतं.

मूग डाळीत असे काही घटक आढळतात, जे तुमच्या आरोग्याला धोकादायक ठरु शकतात.

मुतखडा

जर तूम्हाला मुतखडा म्हणजे किडणी स्टोनची समस्या असेल तर मूग डाळ कमी प्रमाणात खा.

हाय यूरिक एसिड

मूग डाळ खाल्यांन शरीरातील युरिक ॲसिडची पातळी आणखी वाढण्याची शक्यता असते.

पोट फुगणे

मूगडाळीत शॉर्ट चेन कार्ब्स नावाचा घटक असतो. अशा प्रकारचे पिष्टमय पदार्थ पचवणं हे शरीराला जड जातं. मूगडाळ खाल्ल्यामुळे पचनशक्तीवर अधिक ताण येऊन तब्येत बिघडण्याची शक्यता असते.

कमी रक्तदाब

मूगडाळीच्या खाल्यांन रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे अगोदरच ज्यांचा रक्तदाब कमी आहे, त्यांना मात्र याचा फटका बसू शकतो.

लो ब्लड शुगर

मूगडाळ खाल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अधिकच खालावते आणि त्याचा आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story