पावसाळ्यात एकदम फिट राहायचं? तर 'या' गोष्टी टाळा

Jun 29,2023

खाण्याच्याबाबतीत बेफिकीरपणा नको

Monsoon Health Tips : पावसाळा सुरु झाला की आरोग्य जपण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोकाही इतर ऋतुच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे खाण्याच्याबाबतीत गाफील राहू नका.

एकदम फिट राहायचं असेल तर...

Monsoon Health Tips : दिल्ली, मुंबईसह अनेक राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. या ऋतूत डेंग्यू, मलेरियासारखे आजार फैलावतात. पावसाळ्यात एकदम फिट राहायचं असेल तर काही टिप्स फॉलो करा.

पाणी उकळल्यानंतरच प्यावे

पावसाळ्यात नेहमी पाणी उकळल्यानंतरच प्यावे, असा सल्ला डॉक्टर देतात. असे केल्याने पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि जंतू नष्ट होतात. याशिवाय रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू प्यायल्याने हानिकारक विषाणू शरीरातून बाहेर पडतात.

मीठ कमी खा

पावसाळ्यात जेवणात मीठ कमी किंवा चवीनुसार घाला. मीठ शरीरात सोडियमचे प्रमाण वाढविण्याचे काम करते, ज्यामुळे भविष्यात उच्च रक्तदाब देखील होऊ शकतो.

ही फळे खाऊ शकता

पावसाळ्यात तुम्ही जामुन, पपई, जुजुब, सफरचंद, डाळिंब, पीच आणि नाशपाती यांसारखी फळे खाऊ शकता. या फळांपासून मिळणारे पोषण शरीराला संसर्ग, ऍलर्जी आणि सामान्य आजारांपासून दूर ठेवते.

पुरेशी झोप घ्या

पावसाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे अन्न खावे. यामध्ये भोपळा, ड्रायफ्रूट्स, भाज्यांचे सूप, बीटरूट आणि टोफू यासारख्या गोष्टी खाव्यात. याशिवाय दररोज 7-8 तास पुरेशी झोप घेतलीच पाहिजे.

व्यायामावर भर द्या

पावसाळा सुरु झाला की आरोग्य जपण्याचा सल्ला दिला जातो. पावसाळ्यात संसर्गजन्य आजार पसरण्याचा धोकाही इतर ऋतुच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे तुम्ही व्यायामावर भर दिला पाहिजे.

स्ट्रीट फूड टाळा

पावसाळ्यात स्ट्रीट फूड खाण्याची खूप इच्छा होते. पण काही वेळेस काही पदार्थ बाहेरचे खाणे टाळावे. स्ट्रीट फूड बनवताना स्वच्छतेची फारशी काळजी घेतली जात नाही. जास्त वेळ ठेवलेले किंवा तळलेले भाजून खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.

कच्चे खाणे टाळा

पावसाळ्यात कच्चे अन्न खाणे टाळावे. या ऋतूमध्ये मेटाबॉलिज्म खूप मंद गतीने काम करते. त्यामुळे अन्न उशिरा पचते.पावसात बाहेरचा ज्यूस आणि सॅलड खाणे टाळा. स्वत:चे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी काळजी घ्या .

VIEW ALL

Read Next Story