महिला क्रिकेटपटूने हातावर काढून घेतला हनुमानाचा टॅटू; जय श्री रामचाही उल्लेख

एका भारतीय महिला क्रिकेटपटूने हातावर काढलेला हा स्पेशल टॅटू चर्चेचा विषय ठरतोय

भारतीय क्रिकेटपटूंचं टॅटूप्रेम

भारतीय क्रिकेटपटू आणि त्यांचं टॅटूप्रेम हे क्रिकेट चाहत्यांसाठी काही नवीन गोष्ट नाही.

अनेकांची नावं घेता येतील

विराट कोहली, हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, शिखर धवन, इशान किशान यासारख्या अनेकांची नावं घेता येतील एवढा हा टॅटूचा ट्रेण्ड लोकप्रीय आहे.

महिला क्रिकेटपटूंमध्येही टॅटूचा ट्रेण्ड

मात्र आता भारतीय महिला क्रिकेटपटूंमध्येही हा टॅटूचा ट्रेण्ड पहायला मिळत आहे.

दीप्तिचा पहिलाच टॅटू

टीम इंडियामधील आघाडीची अष्टपैलू खेळाडू दीप्ति शर्माने आपल्या हातावर एक सुंदर टॅटू काढून घेतला आहे. हा दीप्तिचा पहिलाच टॅटू आहे.

धार्मिक मान्यतेशी संबंध

दीप्तिचा हा टॅटू फार खास आहे कारण तो तिच्या धार्मिक मान्यतेशी संबंधित आहे.

दीप्ति शर्माने पहिल्यांदाच आपल्या शरीरावर टॅटू काढला आहे. हा टॅटू हनुमानाचा आहे.

डाव्या हातावर टॅटू

दीप्तिने आपल्या डाव्या हातावर हनुमानाचा टॅटू काढला आहे.

जय श्री राम गोंदवलं

दीप्तिने तिच्या हातावर जय श्री राम असंही गोंदवून घेतलं आहे.

दीप्तिच्या या टॅटूमध्ये हनुमानाची गदाही रेखाटण्यात आल्याचं पहायला मिळत आहे. तसेच गदेला जोडून हुमानाचा चेहरा आणि गदेच्या वरच्या भागात शेपटी असा हा टॅटू आहे.

दीप्ति ही हनुमानाची मोठी भक्त असून तीने अनेकदा हनुमानाच्या मुर्तीसमोर काढलेले फोटोही शेअर केले आहेत.

VIEW ALL

Read Next Story