वयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या

Mens Health: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते.

अनेक प्रकारचे आजार

वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.

35 वर्षे ओलांडल्यानंतर

आता वयाची 35 वर्षे ओलांडल्यानंतर स्नायू दुखणे, हाडांच्या समस्या, त्वचेवर सुरकुत्या पडणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात. लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात.

सावधगिरी बाळगा

आजकाल वयाच्या ४० व्या वर्षी महिलांसोबत पुरुषांनाही अनेक प्रकारच्या शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. चाळीशीला पोहोचलेले पुरुष काही सावधगिरी बाळगून शारीरिक समस्या टाळू शकतात.

स्नायू कमकुवत

जर स्नायूंमध्ये समस्या असेल तर तुमच्या हाडांना त्रास होईल. पडल्यामुळे हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. स्नायूंना मजबूत ठेवण्यासाठी तिशीमध्ये व्यायाम करणे आणि सकस आहार घेणे चांगले असते.

कोलेस्टेरॉलची पातळी

वयाच्या ४० व्या वर्षी पुरुषांमध्ये कोलेस्टेरॉलची पातळी वाढू लागते.या वयात पोहोचताच चयापचय क्रिया खूप बदलते. आहार योग्य नसल्यास चयापचय प्रभावित होईल. आज तुम्ही जे काही खाता ते शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्याचे काम करते. कोलेस्टेरॉल वाढले की त्याच्यापासून हृदयाच्या समस्या सुरू होण्याची शक्यता असते.

निरोगी आहार घ्या

रक्तदाब वाढू लागतो. त्यामुळे तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी तपासत राहणे महत्त्वाचे आहे. ज्यामध्ये जास्त तेल, मसाले, जंक फूड, अतिरिक्त कॅलरी, चरबीयुक्त गोष्टींचा समावेश नसेल, असा निरोगी आहार घ्या.

VIEW ALL

Read Next Story