मेथी ही आरोग्यासाठी जितकी लाभदायक आहे तितकीच धोकादायक सुद्धा आहे.
मेथीचं पाणी प्यायल्यावर तुम्हाला कदाचित 'हे' त्रास होऊ शकतात.
गरोदर महिलांनी मेथीचं पाणी शक्यतो पिऊ नये यामुळे गर्भपात होऊ शकतो.
मेथीचं पाणी प्यायल्याने श्वसनाचा त्रास होऊ शकतो त्यामुळे अशा लोकांनी डॉक्तरांचा सल्ल्ला घेऊन मेथीचं पाणी प्यावं.
मेथीचं पाणी प्यायल्यानं अनेकांना घाणेरडे ढेकर येतात. तर काहींना जुलाबाच्या देखील त्रास होऊ शकतो.
मेथीचं पाणी प्यायल्यानंतर अनेकांना अपचनाचा त्रास होऊ शकतो. पोटात गॅस होऊन पॉट फुगू शकते.
ज्यांना कमी रक्तदाबाचा त्रास आहे अशांनी मेथीचं पाणी पिताना काळजी घ्यावी.
(Disclaimer - येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. ती स्वीकारण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे. ZEE 24 तास याची पुष्टी करत नाही.)