सलग 3 रात्र तुम्ही झोपला नाहीत तर काय होईल? सर्वाधिक वेळ जागण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड किती?

निरोगी आरोग्यासाठी झोप हवीच

पुरेशी झोप ही निरोगी आरोग्यासाठी फार आवश्यक असते. मात्र जगात असं कोणतंही औषध नाही जे अपुऱ्या झोपेवर रामबाण ठरु शकतं.

पुरेशी झोप फार महत्त्वाची

त्यामुळेच पुरेशी झोप घेणं हे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फार महत्त्वाचं असतं.

किमान 7 तासांची झोप आवश्यक

रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने (सीडीसी) दिलेल्या माहितीनुसार, 18 ते 60 वर्ष वयातील व्यक्तींना किमान 7 तासांची झोप आवश्यक असते.

ठोस माहिती उपलब्ध नाही

एखादी व्यक्ती झोपेशिवाय किती दिवस जिवंत राहू शकते यासंदर्भातील ठोस माहिती उपलब्ध नाही.

अनेकांना पुरेशी झोप मिळत नाही

मात्र अनेकांना काम, तणाव आणि इतर कारणांमुळे पुरेशी झोप मिळत नाही.

न झोपण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड

1986 साली एका व्यक्ती न झोपता 453 तास 40 मिनिटं जागी राहिली होती. म्हणजेच जवळपास 19 दिवस ही व्यक्ती झोपली नव्हती. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता.

प्रत्येक व्यक्तीवर वेगवेगळा परिणाम

आवश्यकतेपेक्षा कमी झोप होते तेव्हा व्यक्ती थकल्यासारखी वाटते. अर्थात प्रत्येक व्यक्तीवर कमी झोपेचा वेगवेगळा परिणाम होतो.

72 तास जागं राहिल्यास काय होईल?

एखादी व्यक्ती जर 2 रात्र म्हणजे 48 तास किंवा 3 रात्र म्हणजेच 72 तास जागी राहिली तर काय होईल ठाऊक आहे का?

साईड इफेक्ट्स

बहुतांशी लोकांना 24 तासांहून अधिक वेळ झोप न घेतल्यास साईड इफेक्ट्स दिसू लागतात. 24 तास जागं राहिल्यास रक्तामधील अल्कोहोलचं प्रमाण 0.10 टक्के असतं.

जाणवतात हे त्रास

रक्तामधील अल्कोहोलचं प्रमाण वाढल्यास चिडचीड, एकाग्रता गमावणे, तणाव वाढणे, स्थायूंचं दुखणं, ब्लड शुगरचा त्रास होतो.

सलग 2 दिवस न झोपल्यास...

सलग 2 दिवस न झोपल्यास फार थकवा जाणवतो. अशा व्यक्तींना डोळे उघडणेही कठीण जातं. अशा व्यक्तीचा मेंदू बेशुद्धावस्तेत जातो. याला मायक्रोस्लीप असं म्हणतात.

72 तास न झोपल्यास...

जसजशी झोप कमी होत जाते तसा त्रास वाढत जातो. 72 तास न झोपलेल्या व्यक्तीला बेशुद्ध पडणे, चिडचीडेपणा, इतरांशी न बोलणे, ग्लानी येणे असे त्रास होतात.

सातत्याने कमी झोप घेतल्यास

सातत्याने कमी झोप घेणाऱ्यांना ब्लड प्रेशर, स्थूलपणा, मधुमेह, हृदयासंदर्भातील समस्या आणि डिप्रेशनसारख्या समस्या उद्धवतात.

VIEW ALL

Read Next Story