वर्ल्ड कप 2023 मधील बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या जखमी झाला होता. त्याच्या घोट्याला दुखापत झाली होती.
जखमी झाल्यावर टीम इंडियाला हार्दिकची जागा भरून काढता आली नाही, तो संघाबाहेर गेला.
वर्ल्ड कपमध्ये हार्दिकला खेळता आलं नाही. मात्र, आता तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियान्ससोबत दिसणार आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, हार्दिक पांड्या सध्या 18 आठवड्यांच्या हार्ड परफॉर्मन्स प्रोग्राममध्ये सराव करत आहे.
सध्याच्या परिस्थितीत बीसीसीआय (BCCI ) आणि एनसीए (NCA) हार्दिकला संघात आणण्याची घाई करू इच्छित नाही, असं स्पष्ट होतंय.
पुढील टी-२० विश्वचषकांना डोळ्यासमोर ठेवून मंगळवारी पांड्याला ही माहिती देण्यात आल्याचं समोर आलंय.