स्वयंपाक करताना अनेक पदार्थांमध्ये लसूण वापरला जातो. कच्चा लसूण खाल्ल्याने पचनासंबंधी त्रास कमी होतो हे तुम्हाला माहिती असेलच. पण लसूण तळव्याला लावल्यासही अनेक फायदे होतात.
लसूण पायाला लावल्याने शरिराला अनेक फायदे मिळतात. प्रियांका चोप्राही हा उपाय करते. तळव्याला लसून लावल्याने नेमके काय फायदे मिळतात हे जाणून घ्या...
लसणात फॉस्फरस जिंक, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, विटॅमिन सी, विटॅमिन के, फोटोट, नियासीन आणि थायमिनसारखे अनेक पोषणतत्वं असतात.
लसूण शरिरातील ब्लड सर्क्युलेशन वाढवण्यात मदत करतं. लसूण तळव्याला लावल्याने शऱिरातील ऊर्जा वाढते. अशा स्थितीत शरिरातील प्रत्येक भागाला योग्य रक्त पुरवठा होतो.
जर तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास असले तर तळव्यांना लसूण लावणं फायदेशीर आहे. यासह तुम्ही ऋतूंसह येणारे अनेक आजार टाळू शकता.
जर तुम्ही खूप तणावात असाल तर पायाला लसूण लावणं फायदेशीर आहे. लसणात असे गुण आहेत जे मानसिक आणि शारिरीक तणाव कमी करण्यात मदत करतात.
जर तुम्हाला फार थकवा जाणवत असेल तर लसूण फायदेशीर आहे. पायाला लसूण चोळल्याने स्नायूंना आराम मिळतो आणि थकवा कमी होतो.