बायकोने नवऱ्याच्या 'या' 3 चुका कधीच लपवू नये, नाहीतर आयुष्यभर होईल पश्चाताप

Soneshwar Patil
Aug 31,2024


अनेकदा वैवाहिक जीवनात नवऱ्याकडून काही चूक झाली किंवा वाईट सवयी लागल्या तरी महिला या सर्व गोष्टी लपवून ठेवतात.


चाणक्य यांच्या मते, पत्नीने नवऱ्याच्या वाईट सवयी कधीही लपवू नयेत. त्यापेक्षा कुटुंबाशी आणि गरज पडल्यास समाजाशीही बोलले पाहिजे.


चाणक्य म्हणतात पतीची खोटं बोलण्याची सवय कधीही लपवू नये. महिला अनेकदा पतीची ही सवय इतरांपासून लपवून ठेवतात.


अनेक वेळा पतीची हीच सवय पत्नीसाठी हानिकारक ठरते. अशा वेळी नवऱ्याच्या या सवयीबद्दल कुटुंबात चर्चा व्हायला हवी.


चाणक्य नीतिनुसार, अनेकांना बायकोवर संशय घेण्याची सवय असते. त्यामुळे त्यांची ही सवय अनेक वेळा काळाबरोबर वाढते. जर पती जास्त संशयी होऊ लागला असेल तर ही सवय कुटुंब आणि समाजापासून लपवू नये.


राग येणे ही एक सामान्य गोष्ट आहे. परंतु जर पुरुषाचा राग असह्य असेल तर पत्नीने हे तिच्या आई-वडिलांच्या घरी आणि सासरच्या लोकांना सांगावे.

VIEW ALL

Read Next Story