हिरवी मिरची हा किचनमधील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. मिरचीची फोडणी दिल्यास जेवण चटपटीत व झणझणीत होते.
गृहिणी बाजारातून एकदाच मिरच्या घेवून येतात आणि त्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करुन ठेवतात. मात्र, जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्याने मिरच्या सुकतात किंवा गिळगिळीत होतात.
फ्रीजमध्ये हिरव्या मिरच्या कशा स्टोअर कराव्यात असा प्रश्न गृहिणींना पडतो. जाणून घ्या या सोप्या टिप्स
हिरव्या मिरच्या दीर्घकाळापर्यंत स्टोअर करण्यासाठी सर्वप्रथम मिरच्या पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर व्यवस्थित सुकवून त्याची देठ काढून घ्या.
मिरचीची देठ काढून झाल्यानंतर टिश्यू पेपरमध्ये रॅप करुन झिपलॉक बॅगमध्ये ठेवून मग फ्रीजमध्ये ठेवा, असं केल्याने महिन्यांपर्यंत मिरच्या फ्रेश राहतील.
या व्यतिरिक्त एखाद्या एअर टाइट डब्ब्यात टिश्यू पेपर ठेवून त्यात मिरच्या ठेवा आणि मग हा डब्बा फ्रीजमध्ये ठेवा.
फ्रीजची हवा थेट मिरच्यांना लागता कामा नही. त्यामुळं मिरच्या नरम व गिळगिळीत होतात. त्यामुळं नेहमी पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून ठेवा