आलं-लसूण पेस्ट रोजच्या जेवणात वापरात येणारा मुख्य घटक आहे. घाई गडबडीच्या वेळेत पटकन पेस्ट लागू शकते म्हणून काही जणी आधीच पेस्ट तयार करु ठेवतात.
फ्रिजमध्ये साठवून ठेवली की दोन दिवसांनी काळपटपणा येतो. अशावेळी आलं - लसूण पेस्ट महिनाभर कशी टिकवूव ठेवायची याच्या काही सोप्या टिप्स
वाटणासाठी प्रमाणात आलं-लसूण घेऊन स्वच्छ धुवून घ्या आणि पंख्याखाली किंवा उन्हात सुकवून घ्या.
त्यानंतर लसूण व आल्याचं साल काढून मिक्सरमध्ये याची खडबडीत पेस्ट तयार करुन घ्या.
पेस्ट थोडी जाडसर वाटून घेतल्यानंतर दोन चमचे मोहरीचं किंवा घरात असलेले कोणतेही तेल घाला आणि छान बारीक पेस्ट तयार करुन घ्या.
पेस्ट झाल्यावर त्यात चिमुटभर मीठ आणि ३-४ चमचे व्हाइट व्हिनेगर घाला. आता ही पेस्ट छान मिक्स करुन एअर टाइट कंटेनर भरुन ठेवा. ही पेस्ट अगदी महिनाभर छान टिकते.
याशिवाय तुम्ही पेस्ट आइसट्रेमध्ये भरुन 12 तास फ्रिजरमध्ये ठेवा. जेव्हा ही पेस्ट घट्ट होईल तेव्हा त्याचे क्यूब काढून एका झिपलॉक बॅगेत ठेवा