रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फळं व हेल्दी पदार्थांचा समावेश आहारात करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळं व्हिटॅमिन सीयुक्त फळांचे सेवन केले जाते.
पेरुत व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. पण कडक पेरू खाण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही पेरुची चटणी बनवून ट्राय करु शकता. जाणून घेऊया पेरूची चटणी कशी बनवाल.
300 ग्रॅम पेरू, 3-4 हिरव्या मिरच्या, 1/2 आलं, लिंबाचा रस, 1/2 धणे पावडर, 1/2 टी स्पून जीरा पावडर, 1/2 टीस्पून काळी मिरी पावडर, हिंद, 1/2 काळे मीठ, चवीपुरते मीठ, आवश्यकतेनुसार पाणी
पेरूची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम पेरू, हिरवी कोथिंबीर आणि हिरव्या मिरची चांगल्या धुवून घ्या. चटणीसाठी शक्यता थोडे कच्चेच पेरू घ्या. पिवळे व पिकलेले पेरू घेणे टाळावे.
सगळ्यात पहिले पेरूचे छोटे छोटे काप करुन घ्या. शक्य झाल्यास पेरूच्या सगळ्या बिया काढून टाकण्याचा प्रयत्न करा.
आता मिक्सरमध्ये पेरूचे काप, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि आल्याचे बारीक तुकडे करुन टाका.
त्यानंतर त्यात धणे पावडर, जीरा पावडर, काळी मिरी पावडर, थोडेसे हिंग, काळे मीठ, मीठ आणि लिंबाचा रस टाका.
सर्व साहित्य टाकल्यावर चटणी मिक्सरमध्ये बारीक करुन घ्या. जर तुम्हाला चटणी जाडसर वाटत असेल तर थोडे पाणी टाका.