सध्या तुम्ही पाहत आहेत ते म्हणजे एक हॉटेल. त्याचं काम सध्या सुरू आहे.


या हॉटेलचं नावं आहे 'वदनी कवळं'. हे हॉटेल सुरू करणारी मालकीण आहे मराठमोळी अभिनेत्री.


'रंग माझा वेगळा' या मालिकेतून आपण तिला पाहिलंच आहे. ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती.


या मालिकेचा टीआरपीही सगळ्यात वर होता. त्यामुळे सोशल मीडियावरही या मालिकेची चर्चा रंगलेली दिसायची.


सध्या ही मालिका संपली आहे. या मालिकेतील अभिनेत्री अनघा अतुल हिनं नवं रेस्टोरंट सुरू केलं आहे.


सध्या तिच्या या नव्या हॉटेलचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करताना दिसते आहे.


यावेळी तिनं आपल्या हॉटेलच्या आतले काही फोटो शेअर केले आहेत. सध्या याचे काम सुरू आहे. आजकाल अनेक अभिनेते आणि अभिनेत्री या आपल्या नव्या करिअरलाही अशाप्रकारे सुरूवात करत आहेत. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा, शशांक केतकर, सत्या मांजेकर यांनीही आपले हॉटेल्स सुरू केले होते.



''असं म्हणतात कुठल्याही कार्याची सुरूवात बाप्पाच्या नावाने करतात. त्यात बाप्पाच्या आगमनाचा दिवस असेल याहुन मंगल दिवस नाही. गेले काही दिवस एकच प्रश्न विचारला जातोए , “आता पुढे काय?” तर यापुढे पुणेकरांच्या ह्रदयात थोडी जागा निर्माण करायचं ठरवलय! मी आणि माझा भाऊ घेऊन येतोए “वदनी कवळ” परिपूर्ण थाळीचा आस्वाद. शुद्ध, सात्विक आणि रुचकर जेवण. In the heart of Pune, Deccan. लवकरच येतय तुमच्या भेटीला.'' अशी पोस्ट तिनं शेअर केली आहे.


त्यात ती पुढे म्हणाली आहे की, ''खूप धाडस करुन हे पाऊल उचलते आहे. अभिनेत्री म्हणून खूप प्रेम मिळालं आता उद्योजिका म्हणून तुमच्या सहकार्याची, प्रेमाची आणि आशिर्वादाची गरज आहे.''

VIEW ALL

Read Next Story