पुरुषांसाठी अत्यंत फायद्याचे आहे मेथीचे पाणी, पण कसं करावं सेवन?

मेथीचे दाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. मेथीच्या दाण्यामुळं चव तर वाढतेच पण त्यात औषधी गुणधर्मदेखील असतात. अनेक रोगांवर रामबाण उपाय आहेत मेथीचे दाणे

तज्ज्ञांच्या मते, एक चमचा मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवून सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्यावे. यामुळं अनेक रोगांवर नियंत्रण मिळते.

मेथीचे पाणी प्यायल्याने मधुमेह, पीरीयड्स क्रॅम्प, केसगळती आणि लठ्ठपणासारख्या समस्यांवर नियंत्रण मिळते.

मेथीच्या दाण्याचे सेवन केल्यास ब्लड शुगर नियंत्रणात राहते. त्यामुळं मधुमेहींनी मेथीच्या पाण्याचे सेवन केल्यास खूप फायदा होतो.

मेथीचे सेवन केल्यास बद्धकोष्ठता, अॅसिडीटी, ब्लॉटिंग सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

मेथीचे दाणे टेस्टोस्टेरोन हार्मोन्स वाढवण्यास मदत करते. यामुळे इतर प्रकारच्या लैंगिक समस्याही दूर होतात

मेथीचे दाणे बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्राइग्लिसराइड्स कमी करते.

VIEW ALL

Read Next Story