दिग्दर्शक अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप हिचा गुरुवारी साखरपुडा पार पडला. बॉयफ्रेंड Shane Gregoire बरोबर ती लग्नबंधनात अडकणार आहे.

या सोहळ्याला बॉलिवूडमधले अनेक कलाकार उपस्थित होते. पण लाईमलाईटमध्ये होती शाहरुख खानची मुलगी सुहाना खान

या सोहळ्यासाठी सुहाना खानने ब्ल्यू साडी परिधान केली होती. त्याच रंगाची पर्स तिच्या हातात होती. कानात तीने सोनेरी रंगाचे झुमके घातले होते.

तिचा हा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. चाहते तिच्या लूकवर फिदा झाले असून अनेकांनी कमेंट आणि लाईक दिल्या आहेत.

आलिया आणि शेनच्या साखरपुड्याला पलक तिवारीनेही हजेरी लावली होती. त्याचबरोबर खुशी कपूरही होती, तीने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती.

अनुराग कश्यप यांची एक्स वाईफ अभिनेत्री कल्की केकला आपल्या दुसरा पती आणि मुलीसह हजर या सोहळ्याला हजर होती.

आलिया कश्यप आणि शेन ग्रेगोइर गेली तीन वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. दोघांची ओळख एका डेटिंग अॅपवर झाली होती.

दोन वर्ष दोघ लि इनमध्ये राहिले त्यानंतर शेनने आलियाला लग्नासाठी प्रपोज केलं. गुरुवारी त्यांनी साखरपुडा उरकला.

आलीया कश्यप स्वत:चं युट्यूब चॅनेल चालवते. लाईफस्टाईलशी संबंधीत व्हिडिओज ती या चॅनेलवर ती शेअर करते.

VIEW ALL

Read Next Story