गॅस, अ‍ॅसिडीटीपासून एका झटक्यात आराम मिळेल; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

गॅस, अ‍ॅसिडीटी कशामुळे होते?

प्रवास, गर्भधारणा, दुग्धजन्य पदार्थांचे अतिसेवन, ताणतणाव आणि आहारात फायबरचे कमी सेवन यामुळे अनेक वेळा या समस्या निर्माण होतात.

अस्वस्थ वाटते?

गॅस, अ‍ॅसिडीटी ही गंभीर समस्या नसली तरी दीर्घकाळ याचा त्रास होत राहिल्यास प्रकृती बिघडू शकते.

कोमट पाणी

जेवणापूर्वी अपचन, गॅस आणि पोटदुखीच्या समस्येपासून सहज सुटका मिळू शकते.

सब्जा बी

पोटातील गॅस आणि छातीत जळजळ यापासून त्वरित आराम मिळतो.

ओवा

ओवा हा गॅस, अ‍ॅसिडीटीपासून आराम मिळवण्यासाठी अत्यंत गुणकारी मानला जातो.

लिंबू

लिंबाचा रस अपचन, गॅस आणि हार्ट बर्न यासारख्या समस्यांवर रामबाण उपाय आहे. रोज सकाळी लिंबू पाण्याचे सेवन केल्यास अधिक फायदेशीर ठरेल.

ओवा आणि जीरे

ओवा आणि जीरे पाण्यात मिसळून उकळून घ्यावे. थंड झाल्यावर या पाण्याचे सेवन करावे निश्चित आराम मिळेल.

काळी मिरी

गॅसची समस्या असेल तर काळी मिरी खावी. यामुळे गॅस आणि अपचनाची समस्या लगेच दूर होते.

काळे मीठ आणि हिंग पावडर

काळे मीठ आणि हिंग पावडर पाण्यात मिसळून प्यावे.

बडीशेप

जेवणानंतर बडीशेपचे सेवन करावे. गॅस्ट्रिक आणि अ‍ॅसिडीटी सारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

VIEW ALL

Read Next Story