ज्येष्ठ अमावस्येला आज शनी जयंतीचा योगायोग; चुकुनही करु नका 'या' चुका

यावर्षी शनी जयंती 6 जूनला येत आहे. शनी जयंती ज्येष्ठ मासच्या अमावस्येच्या दिवशी आहे.

शनीदेवाला न्यायदेवताही म्हटलं जातं. कारण शनीदेव प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतो.

ज्योतिषांच्या मते शनी जयंतीला काही चुका टाळायला हव्या.

ज्येष्ठ अमावस्येला शनी जयंतीच्या दिवशी कोणत्या चुका करु नये याबद्दल जाणून घ्या

शनी जयंतीला तुळस, दुर्वा, बेलपत्र तोडू नका. असं केल्यास शनीदेव नाराज होऊ शकतात.

शनी जयंतीला काचेच्या वस्तू खरेदी करणं वर्जित मानलं जातं. या दिवशी काचेच्या वस्तू खरेदी करुन घरी आणू नका.

तसंच लोखंडाच्या वस्तूही घरी आणू नका. यासह या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करावं.

शनी जयंतीच्या दिवशी नवे कपडे, नव्या वस्तू खरेदी करणं अशुभ मानलं जातं.

शनी जयंती यावेळी ज्येष्ठ अमावस्येला येत असल्याने सुनसान ठिकाणी जाणं टाळा.

शनी जयंतीला केस आणि नखं कापू नका. असं केल्यास शनी तुमच्या आर्थिक विकासात अडथळा निर्माण करु शकतो.

VIEW ALL

Read Next Story