ऑक्सिजन

रोज चालल्यामुळे शरीराल ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होतो व ऊर्जा वाढते. त्यामुळे किमान सकाळच्या वेळेत थोडं तरी चालत जा. तसेच चिंता कमी होते. मेंदू देखील शांत राहतो.

आयुर्मान वाढते

दररोज 60 मिनिटांपर्यंत चालल्याने मेंदू आणि नर्व्ह दोन्ही शांत होऊन छोटे-छोटे विचार करण्याची क्षमता वाढते. 60 मिनिटांचा वॉकमुळे शरीराच्या जवळपास सर्व अवयवांना फायदा मिळतो ज्यामुळे आपले आयुर्मान वाढते.

वृद्धत्वाची प्रोसेस कमी वेगाने होते

मायटोकॉन्ड्रिया हे शरीर व शरीरातील विविध अवयवांना 90% उर्जा प्रदान करते. यामुळे वृद्धत्वाची प्रोसेस कमी वेगाने होते. ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि मधुमेह या हृदयासाठी धोकादायक ठरणाऱ्या घटकांमध्ये सुधारणा होते.

ताण कमी होतो

जर 4.5 किमी प्रतितास या वेगाने 40 मिनिटे वेगाने चालल्यास कार्टिसोल हे स्ट्रेस हार्मोनची पातळी कमी होते तसेच मेलेटोनिन या झोपेच्या हार्मोनची पातळीही वाढते. यामुळे चांगली झोप लागते. तणाव कमी होतो. तसेच स्नायूही मजबूत होतात.

इम्युनिटी वाढते

शरीराची सुरक्षा करणारे इम्यून सेल बी-सेल, टी-सेल आणि किलर सेलची ॲक्टिव्हिटी वाढते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. चालताना पेशी आकुंचन व प्रसरण पावतात, त्यामुळे पायांच्या नसांवर दाब पडतो.

शरीरातील ऊर्जा वाढते

नियमित चालण्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. तुम्ही थकले असाल तर चालण्यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा निर्माण होऊन तुम्हाला फ्रेश वाटू शकते. ऑक्सिजनच्या वाढत्या प्रवाहामुळे शरीरातील कोर्टिसोल, एपिनेफ्रिन आणि नॉरपेनेफ्रिन किंवा एनर्जी हार्मोन्सची पातळी वाढते.

रक्तातील साखरेची पातळी

अमेरिकन डायबिटीज असोसिएशनने प्रकाशित केलेल्या व्यायामानुसार, दररोज चालणे म्हणजे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.

हृदय आणि रक्तवाहिन्या

दररोज 30 मिनिटे चालणे हृदयविकाराचा धोका कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करते. तुम्ही जितके जास्त वेळ चालाल तितके हृदय आणि शरीरासाठी ते अधिक फायदेशीर आहे.

स्नायू मजबूत होतात

चालण्यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात. त्यांना अधिक बळकट करण्यासाठी, आपण जॉगिंग, सायकलिंग व्यायाम करू शकता.

कॅलरी बर्न

चालण्याने शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. जर तुम्ही तुमच्या नेहमीच्या वेगाने चालत असाल तर तुम्हाला परिणाम दिसणार नाही, त्याऐवजी जास्त वेगाने चालण्याचा प्रयत्न करा.

VIEW ALL

Read Next Story