आलं हे प्रत्येकाच्या घरात आढळते. जेवणाची चव वाढवण्यासाठी आल्याचा वापर तर होतोच पण त्याचबरोबर आयुर्वेदातही आल्याचे महत्त्व सांगितले आहे.
घरात कोणाला खोकला- सर्दी झाली असेल तर त्याला आल्याचा काढा किंवा आलं घातलेला चहा देतात. पण आलं वापरल्यानंतर त्याची साल मात्र फेकून देतात.
तुम्हाला हे माहितीये का आल्याची सालदेखील फायदेशीर आहेत. तुम्हीसुद्धा आल्याची सालं फेकून देत असाल तर आत्ताच थांबा
आल्याची सालं डिटॉक्सीफिकेशनचे काम करतात. सकाळी उठल्यावर एक कप पाणी घ्या आणि साधारण गरम करा
५ पाणी साधारण उकळल्यानंतर त्यात आर्धा लिंबू आणि आल्याची साल टाकून ते पाणी प्या
आल्याच्या सालीचे पाणी पिल्याने तुमचा मेटाबोलिझम पॉवर वाढतो. सोबतच तुमची चयापचनाची शक्तीही वाढते.
आल्याच्या सालीची पावडरदेखील तुम्ही तयार करु शकता. सालं उन्हात छान सुकवून घ्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घ्या. ही पावडर रोज चहात टाकू शकता.
एका स्प्रे बॉटलमध्ये आल्याची सालं, लिंबाचा रस आणि व्हिनेगर टाकून ते क्लिनिंग सिरप म्हणूनही वापरु शकता
आरोग्यासाठी फायदेशीर मसाल्यांपैकी आलं हे सर्वोत्तम असल्याचे मानले जाते