गरोदरपणात कोलेस्ट्रॉल वाढलंय, काय आहेत याची प्राथमिक लक्षणं?
गरोदरपणाच्या काळात महिलांची दिनचर्या बदलण्यापासूनच त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात, वर्तणुकीत होणारे लहानसहान बदलही महिलांपुढे काही आव्हानं निर्माण करतात.
खाण्यापिण्याच्या सवयी गरोदरपणाच्या काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावतात कारण, यादरम्यान त्यांच्या शरीराला आवश्यक असणाऱ्या पोषक घटकांचा पुरवठा केला जातो.
हे घटक संतुलित प्रमाणात पुरवले जाणंही तितकंच महत्त्वाचं. शिवाय शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण नियंत्रणात राहील याबाबतही महिलांनी आणि त्यांच्या डॉक्टरांनी सजग असणं गरजेचं असतं.
गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महिलांच्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढण्यास सुरुवात होते. असं होऊ द्यायचं नसेल तर महिलांनी याची काळजी फार आधीपासूनच घेणं अपेक्षित आहे.
गरोदरपणात जीवनशैली आणि हार्मोनल बदलांमुळं कोलेस्ट्रॉलची पातळी वरखाली होते. ज्यामुळं शरीरावर चरबी जमण्यास सुरुवात होते.
शरीरात टेस्टोस्टरॉन आणि एस्ट्रोजन हार्मोन्सचं संतुलन बिघडल्यामुळं ही समस्या भेडसाते. NCBI च्या मते गरोदरपणात ही समस्या आणखी बळावते.
गरोदरपणात शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढल्याचं नेमकं कसं लक्षात घ्यावं? तर, यादरम्यान उच्च रक्तदाब, श्वसनास त्रास, छातीत दुखणं, मळमळ, थकवा अशी लक्षणं दिसल्यास महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
कोलेस्ट्रॉलच्या वाढत्या पातळीकडे लक्ष न दिल्यास उच्च रक्तदाब, निर्धारिक काळााधी प्रसूती, जेनेटिक डिसऑर्डर अशा समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं.
परिणामी गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये महिलांनी त्यांच्या खाण्यापिण्यात संतुलित आणि पौष्टिक आहाराचा समावेश करावा. किंबहुना बाळासाठी विचार करण्यापासूनच ही सवय अंगी बाणवावी.