हिवाळ्यात अनेकदा आपण कमी पाणी पितो. तहान लागत नसली तरीही शरिराला पाण्याची गरज असते.
शरिरात पाण्याची कमतरता झाली तर, किडनी स्टोन आणि बद्धकोष्ठता यांसारख्या आजार उद्भवू शकतात.
त्यामुळे हिवाळ्यात किती पाणी प्यावं असा प्रश्न नेहमी लोकांना पडतो. अशातच आता तज्ज्ञांनी यावर आपलं मत मांडलं आहे.
पाणी कमी पडल्यामुळे त्वचा क्रॅक होते. त्याचबरोबर अवयव आणि पेशी योग्यरित्या काम करत नाहीत.
योग्य प्रमाणात पाणी न पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. तसेच ऊर्जेची पातळी कमी होण्याची शक्यता असते.
हिवाळ्यात दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना आपल्या क्षमतेनुसार वेगवेगळ्या प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.