आपल्यापैकी अनेकांना कधी न कधी मधमाशी चावली असेल
मधमाश्या कोणाला मुद्दाम चावत नाहीत, त्या आत्मरक्षण करण्यासाठी डंख मारतात.
मधमाशीने केलेला दंश हा तीव्र वेदनादायी असतो, शिवाय चावलेल्या भागावर सुज येणे, ताप येणे, पुरळ येणे अशी लक्षणे दिसून येतात.
मधमाशी चावल्यामुळे शरीरात विष पसरु शकते.
मधमाशीत फॅारमिक अॅसिड सोबत अनेक प्रकारचे केमिकल असतात.फॅारमिक अॅसिडमुळे शरीराला सुज येते.
दंश शरीरात जास्त पसरला तर त्यामुळे रक्त पातळ होते.
श्वसन नलिकेच्या म्युकस मेंब्रेनवर सुज येते. यामुळे श्वसनाचा त्रास होतो, याला एनाफिलेक्सिस असं म्हटलं जातं.
मधमाशी चावल्यावर काय करायचं ? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
दंश झालेली जागा स्वच्छ साबणाने धुवा. यामुळे इनफेक्शन होणार नाही.
बर्फ लावल्याने सुज कमी होते, तसेच वेदना आणि जळजळ कमी होते.
मधमाशी चावलेल्या जा़गेवर मध लावावा आणि मधाचे सेवन करावे.
दही , चुना , टुथपेस्ट ,कोरफडीचा गर देखील लावावा.