तुळशीच्या पानांमध्ये अनेक चांगले अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात.
तुळशीची पाने वापरल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या, मुरुम आणि त्वचेच्या इतर समस्या देखील दूर होऊ शकतात.
तुळशी पानांपासून बनलेल्या टोनरचे फायदे आणि ते घरी कसे बनवावे हे बघूया
तुळशीची पाने, गुलाबपाणी आणि ग्लिसरीन घ्या
त्यानंतर धुतलेली तुळशीची पाने पाण्यात घालून मंद आचेवर उकळवून घ्या
10 मिनिटांनी गॅस बंद करा आणि थंड झाल्यावर गाळणीतून गाळून बाटलीत भरून घ्या.
नंतर त्यात 3 चमचे गुलाबजल आणि 1 चमचा ग्लिसरीन घालून मिक्स करा.
चेहरा स्वच्छ धुवून तो पूर्ण कोरडा करा आणि चेहऱ्यावर हे टोनर स्प्रे करा आणि नंतर मॉइश्चरायझर लावा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)