घरगुती पौष्टिक एनर्जी ड्रिंक; अंगदुखी अन् थकव्यावर रामबाण उपाय

हाडे कमकुवत होतात, सतत थकवा येतो आणि अंगदुखी यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर आम्ही त्यासाठी एक उपाय घेऊन आलो आहोत.

हल्ली बाजारात एनेक एनर्जी ड्रिंक मिळतात मात्र, त्यावर रासायनिक प्रक्रिया केलेली असते. मात्र, घरच्या घरी तुम्ही पौष्टिक एनर्जी ड्रिंक बनवू शकतो.

साहित्य

मखाणा, ओट्स, बदाम,अक्रोड,तीळ,आळीव,भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया, खडीसाखर

खडीसाखर वगळता वरील दिलेले साहित्य एका पॅनमध्ये चांगले भाजून घ्या

त्यानंतर मिक्सरमध्ये भाजलेले सर्व साहित्य टाकून वाटून घ्या. तुम्ही चवीसाठी वेलची पूड किंवा केसरही त्यात टाकू शकता.

बारीक पावडर झाल्यानंतर रोज एक ते दीड चमचा दुधात मिसळून प्या

प्रोटीन असल्यामुळं हे एनर्जी ड्रिंक दिवसभराची ताकद देते त्याचबरोबर यात अनेक पौष्टिक गुणधर्म देखील असतात.

Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही

VIEW ALL

Read Next Story