ड्रायफ्रूट्स म्हंटल की आपल्याला काजू बदाम पिस्ता आठवतं.
पण असं एक ड्रायफ्रूट आहे जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
'चिलगोजा' ही एक प्रकारची बी आहे. जी बदाम, पिस्ता आणि अक्रोड यांसारख्या ड्रायफ्रुट्ससारखी वापरली जाते.
ह्यात व्हिटॅमिन इ , फ़ॉलीक असिड, बी कॉम्प्लेक्स ,मॅग्नेशियम, कॉपर , झिंक , मॅग्नेशिअमसारखे पोषकतत्वे आहेत.
चिलगोजा खाल्ल्याने शरीर मजबूत होते आणि व्हिटॅमिन्सची कमतरता भासत नाही.
चिलगोजे खाल्ल्याने त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे मधुमेहाचा धोका अनेक पटीने कमी होतो.
चिलगोजामध्ये असलेले पॉली-अनसॅच्युरेटेड फॅट्स कोलेस्टेरॉल कमी करतात आणि हृदयरोगांपासून संरक्षण करतात.
चिलगोजापासून बनवलेल्या तेलाचे सेवन वजन कमी करण्यात मोठी मदत होऊ शकते.
चिलगोजेमधील कॅल्शियम जे हाडांच्या मजबूतीसाठी आणि विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे.
चिलगोजामध्ये असलेले ओमेगा -३ डोळ्यांच्या काळजीसाठी उपयुक्त ठरू शकते.
चिलगोजमध्ये आढळणारे ओमेगा-३ आणि ओमेगा-६ फॅटी अॅसिड केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरू शकतात.