मुलांची उंची वाढतच नाहीये, डब्यात द्या 'हे' पौष्टिक पराठे

मुलांचे वाढते वय असते तेव्हाच त्यांना योग्य आहार देणे गरजेचे असते. मुलं पौष्टिक पदार्थ खाण्यास टाळाटाळ करत असतील तर वेगळ्या पद्धतीने बनवून त्यांना खायला द्या.

बीटरूटचे पराठे हा एक उत्तम पर्याय आहे. बीटरुटमध्ये अँटी ऑक्सीडेंट आणि अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. ज्यामुळं मुलांची उंची देखील वाढेल आणि बुद्धीदेखील तल्लख होईल.

बीटरूटाचे पौष्टिक पराठे कसे बनवायचे याची सोप्पी कृती जाणून घेऊया

सर्वप्रथम बीट किसून घ्या. जे बीट किसून घेतले आहे त्यातील रसाच्या मदतीनेच पीठ मळून घ्यावे लागणार आहे.

पराठ्यांसाठी कणिक भिजवत असताना पहिले जितकं बीट किसून घेतलं आहे त्या प्रमाणातच गव्हाचे पीठ घ्यावे त्यात थोडा ओवा, हिंग, दोन चमचे तुप आणि स्वादानुसार मीठ टाका

त्यानंतर यात बीट टाकून पीठ चांगलं मळून घ्या. पीठ मळून घेतल्यानंतर थोडावेळासाठी ठेवून द्या. पीठ थोडे चांगलं फुलून द्या.

आता पराठे तयार करायला घ्या. पराठे लाटून तव्यावर भाजून घ्या. पराठ्यांना तूप लावायला विसरू नका. आता हे पराठे सॉस किंवा लोणच्यासोबत मुलांना खायला द्या

VIEW ALL

Read Next Story