तिशीतच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्यात, Anti Aging टिप्स

दक्षता ठसाळे-घोसाळकर
Oct 25,2023

तुळस

त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी तुळशीच्या पानांचा वापर करा. तुळशीच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट्ससारखे गुणधर्म असतात. जे तुमच्या त्वचेवरील सुरकुत्या घालवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

डाळिंब

सुरकुत्या घालवण्यासाठी डाळिंबाच्या पानांचा वापर करा. ते वापरण्यासाठी, सुमारे 250 मिली तिळाचे तेल घ्या. आता त्यात डाळिंबाची पाने टाका आणि सुमारे 15 ते 20 मिनिटे गरम करा.

कडुलिंब

सुरकुत्याची समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पानांचा वापर करा. कडुलिंबाच्या पानांमध्ये असलेले गुणधर्म सुरकुत्या कमी करतात. त्याचा वापर करण्यासाठी कडुलिंबाची पाने घेऊन बारीक करून त्यात थोडे दही मिसळून चेहऱ्याला लावा.

पेरु

चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर केला जाऊ शकतो. त्यात अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत, जे सुरकुत्या वाढण्यास प्रतिबंध करू शकतात. ते वापरण्यासाठी मूठभर पेरूची पाने बारीक करा.

कढीपत्ता

सुरकुत्या दूर करण्यासाठी कढीपत्ता वापरा. एक पॅन घ्या. ते गरम करून त्यात खोबरेल तेल टाकून उकळावे. आता त्यात कढीपत्ता घालून मंद आचेवर शिजवा. ते थंड होऊ द्या आणि नियमितपणे आपल्या चेहऱ्याची मालिश करा. ते नियमितपणे लावल्याने सुरकुत्या कमी होतात.

VIEW ALL

Read Next Story