खरंच जिरा वॉटर प्यायल्याने पोटाची चरबी कमी होते का?

जिरा हे भारतीय स्वयंपाकाचा एक महत्त्वाच भाग आहे. वेगवेगळ्या पदार्थात त्याचा वापर केला जातो. आयुर्वेद आणि प्राचीन उपचाराचा तो प्रमुख भाग आहे.

जिऱ्यात अनेक गुण असतात जे तुमची पोट आणि पचनासंबंधी समस्यांपासून सुटका करतात. जर तुम्ही रोज सेवन केलं तर अपचन, सूज आणि गॅसची समस्या कमी होते.

जिरा पाणीचं सेवन केल्यास ते एक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं, जे शरारितील विषारी पदार्थ बाहेर काढण्यात मदत करतं.

यामध्ये मॅगनीज, आयर्न, कॅल्शिअम असतं. त्यामुळे रोज सेवन केल्यास चरबी वाढत नाही आणि वजनही कमी होण्यात मदत होते.

याशिवाय जिऱ्यात अनेक पोषकतत्वं असतात जे पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्म मजबूत करतात. ज्याची वजन कमी करण्यात मदत होते.

तुमचं कोलेस्ट्रॉल रोखण्यातही मदत होते, ज्यामुळे ह्रदयाशी संबंधित आजार टाळू शकता. हे धोकादायक ट्राइग्लिसराइड्सचं प्रमाण कमी करण्यातही मदत करतं.

तुम्ही रात्री जिरा पाणी प्यायल्यास झोप चांगली लागते. यामधील मॅग्नेशिअम झोप वाढवण्यात मदत करतं.

जिऱ्यात अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे आरोग्यासह तजेलदार त्वचेतही मदत करतात.

ही माहिती सामान्य माहितीवर देण्यात आली असून, अंमल करण्याआधी आरोग्यतज्ज्ञ, डॉक्टरांशी संपर्क साधा.

VIEW ALL

Read Next Story