एकहाती सामना जिंकवला

ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेलने द्विशतक झळकावत अफगाणिस्तानविरुद्धचा सामना एकहाती जिंकून दिला.

नाबाद 201 धावा

मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या.

सेमीफायनलमध्ये प्रवेश

मॅक्सवेलने मिळवून दिलेल्या या विजयामुळे ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कप 2023 च्या सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ ठरला आहे.

सामना जिंकवून दिला

292 धावांचा पाठलाग करताना 91 धावांच्या आत 7 गडी बाद झालेले असताना मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स या दोघांनी अधिक पडझड न होऊ देता सामना जिंकवून दिला.

विजयाचा घास ओढला

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात प्रतिस्पर्धी संघाच्या तोंडचा विजयाचा घास मॅक्सवेलने ओढून घेतला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

द्विशतक झळकावणारा पहिला ऑस्ट्रेलियन

मॅक्सवेलने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यामध्ये नाबाद 201 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून द्विशतक झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.

क्रॅम्प आला तरी खेळला

मॅक्सवेलच्या पायामध्ये क्रॅम्प आलेला असतानाही त्याने मैदान सोडलं नाही. मॅक्सवेल खेळणार नाही असं वाटत असतानाही तो शेवटपर्यंत मैदानावर उभा होता.

विक्रमी पार्टनरशीप

मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स आठव्या विकेटसाठी विक्रमी पार्टनरशीप करत सामना जिंकून दिला. या विजयानंतर दोघांवरही खास करुन मॅक्सवेलवर कौतुकाचा वर्षाव होतोय.

विराटची पहिली प्रतिक्रिया

आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीनेही या लिगमधील संघ सहकारी असलेल्या मॅक्सवेलच्या खेळीवर प्रतिक्रिया नोंदवली आहे.

मोजक्या शब्दांमध्ये कौतुक

मॅक्सवेलची नाबाद 201 धावांची खेळी पाहून विराटने अगदी मोजक्या शब्दांमध्ये त्याचं कौतुक करणारी इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे.

विराटने दिलेली कॅफ्शन चर्चेत

'फक्त तुलाच हे जमू शकतं' अशी कॅप्शन देत विराटने इन्स्ट्गारम स्टोरीमध्ये मॅक्सवेलचा फोटो शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.

VIEW ALL

Read Next Story