या फळांवर पाणी पिऊ नका

संत्री, किनो, टरबूज, पपई, कस्तुरी, अननस, स्ट्रॉबेरी, आंबा आणि काकडीसारखी फळे खाल्यानंतर 30 मिनिटे पाण्याचे सेवन करणे टाळले पाहिजे.

फळे खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

फळांमध्ये जबरदस्त हायड्रेटिंग पॉवर असते जी आपली तहान शांत करण्यासाठी पुरेशी ठरते. पण फळांचे सेवन केल्यानंतर जर तुम्हाला तहान लागली असेल तर किमान 30 मिनिटे थांबाणे हे योग्य ठरू शकते.

असंतुलित होते PH लेवल

फळं खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्यामुळे पचनाशी संबंधित अवयवांचे पीएच लेवन बिघडते. पोटाची (Stomach) सामान्य पीएच पातळी आम्लीय म्हणजेच अॅसिडीक असते, जी 1.5 ते 3.5 दरम्यान असते.

फळांवर पाणी प्यायल्याने पचन प्रक्रिया मंदावते

फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने हे पाणी शरीरातील आवश्यक पाचन एंजाइम्सला सौम्य करून पचन प्रक्रिया मंद करते. हे गॅस्ट्रिक अॅसिडला पातळ करते ज्यामुळे पोटात खूप काळ न पचलेले अन्न तसेच पडून राहते.

फणस

फणस खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये. त्यामुळे डायरियासारख्या समस्या उद्भवू शकतात. जॅकफ्रूट खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्याने पोटाच्या पीएचवर परिणाम होतो आणि पचन मंद होते कारण पाणी पाचक ऍसिड आणि एन्झाइमची क्रिया पातळ करते.

डाळिंब

डाळिंबामध्येही अनेक पोषक तत्व असतात. पण डाळिंब खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर हे नुकसानकारक ठरू शकतं. याने शरीराला पोषक तत्व मिळत नाहीत.

सफरचंद

सफरचंद खाल्ल्यावरही पाणी पिणं टाळलं पाहिजे. सफरचंदाने आरोग्याला अनेक फायदे आहेत. पण हे खाल्ल्यावर लगेच पाणी प्याल तर त्यातील आवश्यक तत्व शरीराला योग्यपणे मिळू शकत नाहीत.

पेर

पेर खाल्ल्यावर लगेच पाणी पिणं टाळा. याचं कारण याने तुम्हाला सर्दी-खोकला होऊ शकतो. त्यामुळे पेर खाल्ल्यावर लगेच पाणी न पिता थोड्या वेळाने प्यावं.

केळी

केळी खाल्ल्यावर सुद्धा पाणी प्याल तर पचनसंबंधी समस्या तर होतेच, सोबतच याने सर्दी-खोकला होण्याचीही शक्यता जास्त असते.

पेरु

अनेकांना पेरू खाल्ल्यानंतर पाणी पिण्याची सवय असते. पण पेरू खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायलात तर असं केल्याने तुमची पचन बिघडू शकतं. त्यामुळे पेरू खाल्ल्यावर पाणी पिऊ नका.

कोणती फळे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये

काही लोक फळं खाल्ल्यानंतरही लगेच पाणी पितात. पण तुम्हाला माहिती आहे का की असे करणे तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते. चला, आज आम्ही तुम्हाला येथे सांगणार आहोत की कोणती फळे खाल्ल्यानंतर पिऊ नये.

VIEW ALL

Read Next Story