पावसाळी वातावरण

पावसाळी वातावरणात दुखतंय तुमचं पोट? करा हे घरगुती, सोपे उपाय

झणझणीत पदार्थ

मग? मग काय... भजी, चहा, मिसळ, मॅगी या आणि अशा अनेक पदार्थांचा बेत आखला जातो. एखाद्या सुट्टीच्या दिवशी झणझणीच मटण-चिकनचा रस्सा, पाटवड्या अशा पदार्थांचाही बेत आखला जातो.

थोडक्यात काय, तर...

थोडक्यात काय, तर वातावरणात गारवा पसरवणाऱ्या पावसाळी दिवसांमध्ये गरमागरम पदार्थ हवेच. पण, या साऱ्यामध्ये पोट बिघडतंय त्याचं काय?

गॅस्ट्रो आजार

पावसाळी दिवसांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासोबतच पोटदुखीचा त्रासही सतावतो. गॅस्ट्रो आजाराचा अधिक धोका असणारा हा ऋतू तितकाच सावधगिरी बाळगण्याचा.

पोटदुखी

सर्वप्रथम म्हणजे पावसाळ्यात पोटदुखी रोखण्यासाठी बाहेरचं खाणं टाळा. दुषित पाण्यामुळं अगदी सहजपणे तुम्हाला जंतूसंसर्ग होऊन आजारपण ओढावू शकतं. त्यामुळं पाणीपुरी, बाहेरचे ज्युस, सरबतं शक्यतो टाळा.

पावसाळी आजार

पावसाळी आजार आणि त्यातही पोटविकार टाळण्यासाठी काही गोष्टींची विशेष काळजी घ्या. प्रसाधनगृहातून जाऊन आल्यानंतर हात साबणानं स्वत्छ धुवून घ्या.

ताजे अन्नपदार्थ

मांस, मासे, भाज्या स्वच्छ करून धुवून त्यानंतरच ते योग्य पद्धतीनं शिजवावेत. शक्य तितके ताजे अन्नपदार्थ खाण्याला प्राधान्य द्यावं.

शारीरिक सुदृढता

पावसाळी दिवसांमध्ये शारीरिक सुदृढता कायम ठेवण्यासाठी व्यायाम करा. योगासनं करा, ज्यामुळं आतड्यांचं आरोग्य उत्तम राहतं.

पोटविकाराची कारणं

सहसा तणाव, नैराश्य या साऱ्याचा परिणामही पोटावर आणि पचनसंस्थेवर होत असतो. त्यामुळं तुमता पोटविकार नेमका कशामुळं आहे यामागचं कारण जाणून घ्या.

VIEW ALL

Read Next Story