थायरॉइड असलेल्या रुग्णांनी भात खावा का?

थायरॉइडच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ज्येष्ठांबरोबरच तरुणही या आजाराच्या विळख्यात सापडत आहेत

Mansi kshirsagar
Sep 13,2023


थायरॉइड ग्रंथीची होणारी अनिर्बंध वाढ झाल्यावर हा विकार उद्भवतो. विशेषतः महिलांमध्ये हा आजार वाढताना दिसत आहे. थायरॉइड असलेल्या रुग्णांनी भात खावा का, हे जाणून घेऊया.


तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, भातात ग्लूटेन प्रोटीन असते. जे थायरॉइडच्या रुग्णांसाठी नुकसानदायक ठरु शकते. या प्रोटीनमुळं शरीरातील अँटीबॉडीजची संख्या कमी होते. तसंच, ग्लुटेनमुळं थायरॉक्सिन हार्मोन्स अनियमित होते.


थायरॉइडच्या रुग्णांनी कोबी, ब्रोकोली, फ्लॉवर यासारख्या फळभाज्या खाणे टाळावे. कारण या भाज्यांमध्ये गायट्रोगनची मात्रा अधिक आढळते. ज्यामुळं शरीरात थायरॉइडचा स्तर वाढू शकतो.


सोया फूड्सचे सेवन करणेही नुकसानदायक ठरु शकते. सोया खाल्ल्याने हायपो थायरॉइडिजमचा धोका वाढतो. तसंच, चहा, कॉफीचे सेवन करणेही टाळावे.


चहा, कॉफीमध्ये असलेले कॅफिन थायरॉइडच्या रुग्णांसाठी घातक ठरु शकते. इतकंच काय तर, औषधांचा असरही कमी करते. याव्यतिरिक्त गहू, ब्रेड, पास्ता आणि बटाट्यासारखे पदार्थ टाळावेत.


थायरॉइडच्या प्रमुख लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे वजन वाढणे. त्यामुळं रुग्णांनी हेल्दी डाएट फॉलो करावे. यात ब्लूबेरीज, चेरी, बीट, दूध-दही, आयोडिनयुक्त पदार्थ खावेत.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा वापर करण्यापूर्वी कृपया वैद्यकीय सल्ला घ्या. ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story