ओठ नैसर्गिकरित्या पिंक दिसण्यासाठी 5 घरगुती उपाय


अनेक मुली आणि महिला आपल्या ओठांचे काळपण लिपस्टिकने झाकतात. पण यासाठी नैसर्गिक उपाय जाणून घेऊया.


तुम्हालापण बॉलिवूड अभिनेत्रींप्रमाणे नैसर्गिक पिंक ओठ हवे असतील तर काही घरगुती उपाय जाणून घ्या.


काही महिलांचे ओठ जन्मत: पिंक असतात. पण काही वर्षांनी काळे पडतात. हे ओठ पुन्हा पिंक बनणे शक्य आहे.


जास्तीत जास्त पाणी प्या. यामुळे ओठ फाटणार नाही आणि तजेलदार राहतील. तसेच ओठांचे डिस्कलरेशनदेखील जाईल.


ताज्या कोरफोडाचे तेल मधासोबत मिक्स करुन ओठांना लावा. आता हे 15 मिनिटे ठेवा. नंतर स्वच्छ पाण्याने ओठ धुवा. यामुळे ओठ सॉफ्ट आणि पिंक होतील.


बीटचा रस ओठांना लावून 15 मिनिटे ठेवा आणि धुवा. चांगल्या रिझल्टसाठी आठवड्यातून 2 दिवस हा प्रयोग करा. बीटमधील बरगंडी रंग तुमचे ओठ नैसर्गिकरित्या पिंक करेल.


नॅपकिन किंवा ब्रश ओला करुन ओठांवर हलक्याने हाताने पुसा. यामुळे ओठांची डेड स्किन निघेल. यामुळे ओठांवरील रक्ताभिसरण चांगले होईल.


मुलायम, पिंक ओठांसाठी रात्री झोपताना खोबरे तेल लावा.

VIEW ALL

Read Next Story