निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुमच्यासाठी नारळपाणी हा एक उत्तम पर्याय आहे. नारळाचे पाणी केवळ हायड्रेशनच्या दृष्टीनेच नाही तर शरीराला पोषण देण्याच्या दृष्टीनेही उत्तम आहे.
नारळाच्या पाण्यात अँटिऑक्सिडेंट असल्याने आपलं शरीरत हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.
नारळाच्या पाण्यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. यामुळे पचन प्रक्रिया सुधारण्यास मदत होते. यामुळे पोटाचे आजार दूर राहतात.
नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यासारखे महत्वाचे इलेक्ट्रोलाइट्स असतात. ज्यांना खूप घाम येतो त्यांच्यासाठी नारळ पाणी मदत करु शकते.
मधूमेहाचा आजार असलेल्यांनी नारळाच्या पाण्याचं जास्त सेवन करु नये. नारळ पाणी नैसर्गिक गोड असतं. त्यामुळे दिवसातून एका ग्लासापेक्षा जास्त नारळ पाणी पिऊ नये
रोज नारळपाणी प्यायल्याने ब्लेड प्रेशर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. पण ज्यांना लो ब्लड प्रेशरचा त्रास आहे अशा व्यक्तींना नारळ पाण्यापासून दूर राहणाचं चांगलं.
किडनीचा त्रास असलेल्या व्यक्तींनी नारळ पाणी पिऊ नये असा सल्ला दिला जातो. कारण नारळ पाण्यात पोटेशियमची मात्रा जास्त असते. यामुळे किडनी स्टोनची समस्या उद्भवू शकते
नारळ पाणी हे नैसर्गिक थंड असतं. अशात ज्यांना सर्दी खोकला झालाय त्या व्यक्तींनी नारळ पाणी न पिणं चांगलं.
Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. त्यामुळे तुम्ही वैद्यकीय सल्ला जरूर घ्या. ZEE 24TAAS याची पुष्टी करत नाही