उन्हाळ्यात फणसाचा गर ताव मारून खाल्ल्यानंतर अनेक मंडळी, विशेष म्हणजे कोकणातील मंडळी या फणसाच्या बिया म्हणजेच आठळ्या साठवून ठेवतात.
गावाकडे या बिया वाळवून त्यांचा वापर पावसाळी दिवसांमध्ये जेवणात जोड देण्यासाठी केला जातो. फणसाच्या बियांमधघ्ये व्हिटॅमिन ए, सी, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
फणसाच्या बिया काही मंडळींसाठी मात्र योग्य ठरत नाहीत. कारण, त्यामुळं काही मंडळींना रक्तदाब कमी होण्याचा त्रास सतावतो. त्यामुळं Low BP असणाऱ्यांनी फणसाच्या बिया खाऊ नयेत.
फणसाच्या बियांमुळं रक्त पातळ होतं. काही मंडळी रक्त पातळ करण्यासाठीची औषधं घेत असतात. अशा व्यक्तींनी फणसाच्या बिया खाऊ नयेत. कारण, त्यांना यामुळं रक्त पातळ होण्याचा धोका संभवतो.
एखाद्या व्यक्तीला हायपोग्लायसिमीया असेल, तर त्या व्यक्तीनं फणसाच्या बिया खाऊ नये. फणसाच्या बियांमुळं शरीरातील साखरेचं प्रमाण कमी होतं त्यामुळे या व्यक्तींनी फणसाच्या बिया शक्यतो टाळाव्यात.
फणसाच्या बिया काहींसाठी वर्ज्य असल्या तरीही काही मंडळींसाठी मात्र वरदान ठरतात. बियांमध्ये असणारे पोषक घटक डोळ्यांच्या आरोग्याला हातभार लावतात.
दुधात भिजवलेल्या फणसाच्या बिया पेस्ट करून हे मिश्रण चेहऱ्याला लावल्यास सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळं फणसाच्या बिया सौंदर्यात भर टाकण्यासाठीही मदत करतात. (वरील माहिती सामान्य संदर्भांच्या आधारे घेण्यात आली असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)