हिंदू धर्मामध्ये कृष्ण जन्माष्टमी हा सण महत्त्वाचा मानला जातो. यावर्षी कृष्ण जन्माष्टमी 26 ऑगस्ट 2024 ला साजरी करण्यात येणार आहे.
यादिवशी लोक भक्तीभावाने बाल कृष्णाची सेवा करतात. बाल कृष्णाच्या पूजेसाठी वस्त्रांचा वापर करत असतो. पण अनेकवेळा हे कपडे जुने होतात त्यावेळी त्या कपड्यांचं काय करावं?
जर बालकृष्णाचे कपडे फाटले असतील तर ते कपडे शिवू नयेत.
खरंतर फाटलेले कपड्यांची पूजा करणं निषिद्ध मानले जाते.
जर बालकृष्णाच्या कपड्यांना काही झाले असेल तर त्या कपड्यांना फेकून न देता जमिनीखाली पुरावेत.
त्याचबरोबर ते कपडे तुम्ही देव घरातील मंदिर सजावटीसाठी देखील वापरू शकता.