मलाच मच्छर जास्त का चावतात? असा प्रश्न काही लोकांना पडतात. पण खरच काही लोकांना इतरांपेक्षा मच्छर जास्त त्रास देतात, याचं कारण एका अभ्यासातून समोर आलं आहे.
प्रसिद्ध इर्मेटोलॉजिस्ट लिंडसे जुब्रित्स्की यांनी मच्छर कोणाला जास्त चावतात याची वेगेवगळी कारणं सांगितली आहेत. जांच्या रक्तात साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा लोकांना मच्छर जास्त चावतात
तसंच ज्या लोकांचा ब्लड ग्रुप ओ आहे अशा लोकांवरही मच्छर हल्ला करतात. ओ ब्लड ग्रुपच्या लोकांना मच्छरापासून धोका आहे.
शरीरातील उच्च तापमान आणि जास्त घाम येणाऱ्या लोकांकडेही मच्छर आकर्षित होतात. घामामुळे शरीराला येणाऱ्या दुर्गंधीमुळे मच्छर चावू शकतात.
जुब्रित्स्की यांनी केलेल्या दाव्यानुसार एखादी व्यक्ती 350 एमएल पेक्षा जास्त बिअर प्यायला असेल. तर अशा व्यक्तीला मच्छर जास्त चावू शकतात.
मच्छार कार्बन डाई ऑक्साईडही आकर्षिक होतात. त्यामुळे मोठ-मोठ्याने श्वाच्छोश्वास करणाऱ्या व्यक्तींना मच्छरांचा त्रास होऊ शकतो.
मच्छरांना दूर ठेवण्यात कपड्यांचे रंगही उपयोग ठरू शकतात. म्हणजे हलक्या रंगाचे कपडे घालणाऱ्या लोकांना मच्छरांचा कमी त्रास जाणवतो.