'या' 6 प्रकारच्या व्यक्तींनी बदाम खाणं टाळा
आपल्या प्रत्येकाला माहिती आहे. बदाम खाण्याचे आरोग्यास अनेक फायदे आहेत. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी बदाम खूप उपयुक्त आहे.
मात्र बदामाचं सेवन काही लोकांनी टाळायला पाहिजे अन्यथा त्यांना आरोग्याच्या समस्या जाणवू शकते.
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असेल त्यांनी बदाम खाणे टाळलं पाहिजे. औषधांसोबत बदाम खाल्ल्याने तुमच्या आरोग्याला हानी होते.
ज्या लोकांना किडनी स्टोन किंवा पित्ताशयाची समस्या आहे. त्या लोकांनीही बदाम खायला नको.
तुम्हाला पचनाची समस्या असेल तर बदाम खाणे तुम्ही टाळलं पाहिजे. बदाममध्ये भरपूर फायबर असतं त्यामुळे तुमची समस्या वाढू शकते.
तुम्ही Antibiotics औषधं घेत असला तर तुम्ही बंद खाणे बंद केलं पाहिजे. कारण बदाममध्ये जास्त प्रमाणात मॅग्नेशियम असतं. ज्याच्या सेवनाने तुम्हाला त्रास होऊ शकतो.
लठ्ठपणाचा त्रास असलेल्या लोकांनी बदामाचं सेवन करु नये. कारण यात भरपूर कॅलरीज आणि फॅट असतात.
जर तुम्हाला ॲसिडिटीचा त्रास असल्यास तुम्हीदेखील बदाम खाऊ नयेत. (वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)