ऑपरेशन करताना डॉक्टर हिरवा किंवा निळा कपडा का घालतात?

तुम्ही डॉक्टरांना कधी पाहिलं असेल तर ते नेहमी सफेद रंगाचे जॅकेट घालतात. पण जर तुम्ही कधी ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांना पाहिलं असेल तर मात्र चित्र वेगळं असतं.

हिरवे किंवा निळे कपडे

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर कधीच सफेद कपड्यांमध्ये नसतात, तर हिरव्या आणि निळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये असतात. यामागील कारण काय आहे ते समजून घ्या...

रंगात बदल का?

यामागे एक कारण आहे. एक वेळ होती जेव्हा डॉक्टर ऑपरेशन करताना सफेद कपडे घालत असत, पण एका मोठ्या कारणामुळे रंगात बदल करण्यात आला.

जास्त वेळ

अनेकदा डॉक्टरांना ऑपरेशन थिएटरमध्ये बराच वेळ थांबावं लागतं. यावेळी त्यांना फार काळ रुग्णाचं रक्त पाहावं लागतं.

रंगभ्रम

लाल रक्त पाहिल्यानंतर जर डॉक्टरांनी सफेद कपडे घातलेल्या आपल्या कर्मचाऱ्याला पाहिलं तर त्याला सफेदऐवजी हिरवा रंग दिसू लागतो.

दृश्य भ्रम

रंगभ्रम होणाऱ्या या घटनेला 'Visual Illusion' म्हटलं जातं. यामध्ये डॉक्टरला सतत हिरव्या रंगाचा भ्रम होऊ शकतो.

...म्हणून करण्यात आला बदल

अशा स्थितीत डॉक्टरांचं लक्ष ऑपरेशनवरुन विचलित होऊ शकतं. हीच गोष्ट लक्षात घेत 20 व्या शतकात एका डॉक्टरने कपड्यांच्या रंगात हा बदल केला.

डोळ्यांना आराम

यामुळे डॉक्टरांच्या डोळ्यांना आराम मिळेल आणि रंगाचा भ्रमही होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं.

आणखी एक कारण

काही तज्ज्ञांच्या मते, हिरवा किंवा निळा रंग व्यक्तीच्या मनाला शांतता देतं, ज्यामुळे एकाग्रता वाढते. कदाचित यामुळेच डॉक्टरांना या रंगाचे कपडे दिले असावेत.

VIEW ALL

Read Next Story