Weight मोजल्यावर प्रत्येक वेळी मशीन वेगवेगळं वजन सांगते, म्हणजे तुमचं चुकतेय

वजन कमी करण्यासाठी आपल्या शरीराचं योग्य वजन माहिती असायला हवं. मात्र मशीनवर वजन केल्यास प्रत्येक वेळी वेगवेगळं वजन दाखवतो. म्हणजे तुमचं काही तरी चुकतंय.

तज्ज्ञांच्या माहितीनुसार, वजन मोजण्यासाठी काही नियम आहेत. जाणून घेऊयात त्या नियमाबद्दल

दिवसभराच्या हालचाली, व्यायम यामुळे संध्याकाळी वजन केल्यास त्यात तुम्हाला कायम तफावत दिसेल.

तज्ञ्जांनुसार वजन करताना पोट कायम रिकामं असावं. पाणी, औषध, चहा या कसल्याच सेवन केलेलं नसावं.

वजन करण्याआधी ब्लॅडर रिकामं करावं अन्यथा युरिनचं वजनही तुमच्या वजनात मोजलं जातं.

त्यामुळे सकाळी उठल्यावर युरिन केल्यानंतर रिकाम्या पोटी वजन करणं ही सगळ्यात योग्य वेळ असते.

सकाळी रिकाम्या पोटी केलेलं वजन ही आपल्या शरीराचं योग्य वजन असतं. शिवाय आदल्या दिवशी आपण काय खाल्लं, किती पाणी प्यायलं आणि किती शरीराची हालचाल किंवा व्यायाम केला हे दर्शवतो. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story