सीताफळ खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे देखील आहेत. काही लोकांसाठी सीताफळ हानीकारक ठरु शकते.
अपचनाची समस्या असल्यास सीताफळ खाल्ल्यानंतर उलट्यांचा त्रास होऊ शकतो.
जास्त प्रमाणात सिताफळ खाल्ल्यास पोट बिघडू शकते. अतिसार होऊ शकतो.
सीताफळाच्या बिया विषारी असतात यामुळे विशिष्ट प्रकारची एलर्जी असणाऱ्यांनी सीताफळ खाऊ नये.
सीताफळमध्ये खूप कॅलरीज असतात, यामुळे वजन वाढू शकते.
मधुमेह रुग्णांनी सीताफळ खाऊ नये. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.
विशिष्ट आजारावर औषध घेत असाल तर सीताफळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.