भारताच्या इतिहासात बऱ्याच अशा वीर स्त्रिया होत्या ज्या देशासाठी लढल्या होत्या. महाराष्ट्रही या बाबतीत मागे नव्हता. इथं नजरा रोखणारं नाव होतं महाराणी ताराबाई भोसले यांचं.
महाराणी ताराबाई मराठा राज्याचे संस्थापक सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकट्या सूनबाई होत्या.
वयाच्या 8व्या वर्षी ताराबाईंचा विवाह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाराम या धाकट्या मुलाशी झाला होता.
वीर ताराबाईंनी बरीच वर्षेc देऊन आपल्या राज्याची सुरक्षा केली होती. त्यांना 'मराठ्यांची राणी' म्हणून ओळखलं जातं.
वयाच्या 25व्या वर्षी ताराबाईंनी औरंगजेबाविरुद्ध बऱ्याच लढायांचं यशस्वी नेतृत्वं केलं होतं
औरंगजेबाला कडवी झुंज देत असल्यामुळं राणी ताराबाई कायमच त्याच्या वाटेतलं आव्हान ठरत होत्या.
अखेरच्या श्वासापर्यंत ताराबाई मराठा साम्राज्यासाठी काम करत होत्या आणि त्यांच्याच प्रयत्नांमुळं मराठा साम्राज्यानं कैक वर्षे औरंगजेबाच्या गुलामगिरीशी संघर्ष करत त्यालाही नमवलं.