कडीपत्त्याचे आश्चर्यकारक फायदे

जेवणात वापरला जाणारा कडीपत्ता फक्त जेवणाचा आस्वाद वाढवत नाही तर आरोग्यासाठीही चांगला असतो.

कडीपत्यात पोषकतत्वं

कडीपत्यात कॅल्शियम, आयर्न, विटॅमिन सी, विटॅमिन ए असे पोषकतत्वं असतात. त्यामुळे त्याचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

रिकाम्या पोटी खावा कडीपत्ता

वजन कमी करण्यातही कडीपत्ता फायद्याचा ठरतो. जाणून घ्या कडीपत्त्याचे नेमके फायदे

दृष्टीत सुधारणा

रिकाम्या पोटी कढीपत्ता खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी सुधारते. इतकंच नाही तर यामध्ये विटॅमिन असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठीही मदतशीर ठरु शकतात.

मॉर्निग सिकनेस

मॉर्निग सिकनेस दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी कडीपत्ता खाणं चांगलं आहे. यामुळे फक्त उलटीच नाही तर मळमळणे यासारख्या इतर समस्याही दूर होतील,

लिंबूपाण्यात कडीपत्त्याचा रस

मॉर्निंग सिकनेस घालवण्यासाठी तुम्ही लिंबूपाण्यात साखर आणि कडीपत्त्याचा रस मिसळून पिऊ शकता.

आतड्यांच्या समस्यांपासून आराम

आतड्यांची समस्या दूर करण्यासाठी रिकाम्या पोटी कडीपत्ता खाणं फायद्याचं आहे. यामुळे यकृताच्या कार्यक्षमतेही सुधार होतो.

वजन कमी करण्यात मदत

वजन कमी करायचं असेल तर रिकाम्या पोटी कडीपत्ता तोंडात ठेवून चावत राहा. यामुळे रक्तातील साखर नियंत्रित होण्याबरोबरच कोलेस्ट्रॉलही कमी होतो. यासाठी सकाळी उठल्यावर तुळशीच्या पानासह कडीपत्ताही खावा.

मजबूत पचनक्रिया

कडीपत्त्याचं सेवन केल्याने फक्त पोटदुखी दूर होत नाही. तर बद्धकोष्ठता, अपचन असणाऱ्यांनीही तो खाल्ला पाहिजे. दही किंवा ताकासह तुम्ही त्याचे सेवन करु शकता. यामुळे पचनक्रिया सुधारते.

VIEW ALL

Read Next Story