फळांवर मीठ किंवा साखर शिंपडल्यानंतर फळांना पाणी सुटते. मीठ आणि चाट मसाल्यामध्ये आढळणारे सोडियम आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते.
सोडियम मीठ किंवा मसाल्यांमध्ये आढळते. या सोडियममुळे आपल्या शरीरातील पाणी तर वाढतेच पण किडनीवरही वाईट परिणाम होतो.
कापलेल्या फळांवर मीठ किंवा कोणताही मसाला टाकताच फळांमधील आवश्यक पोषक तत्वे नष्ट होतात आणि फळे पूर्वीसारखी निरोगी राहत नाहीत.
मिठासह फळे खायला आवडत असल्यास शरीरात जळजळ होऊ शकते. त्यामुळे शरीर फुगलेले दिसते. कधीकधी या समस्येमुळे हात-पायांवर सूजही येते.
फळ नैसर्गिकरित्या गोड असतात. फळांमध्ये ग्लुकोज असते. यामुळे फळांचे सेवन केल्याने शरीरात कॅलरीज वाढतात.
जेव्हा जेवणासाह फळांचेही सेवन करतो तेव्हा कार्ब्स आणि कॅलरीज आणखीन वाढतात. अशा परिस्थितीत जेवणातील कार्ब्सचे प्रमाम कमी करून फळं खाऊ शकतो. अन्यथा जेवण आणि फळं एकत्र खाऊ नयेत.