उन्हाळ्यात नुसतं पाणी पिण्याऐवजी त्यासोबत ग्लुकॉन डी (Glucon D) अथवा गुळ किंवा साखर खाल्यानं तहान शमते आणि ऊर्जाही मिळते.
मटक्याच्या भांड्याच्या पाण्याचा (Drink Potable Water) तुमच्या पचनक्रियेवर चांगला परिणाम होतो. मटक्याचं पाणी फ्रिजच्या पाण्यापेक्षा जास्त फायदेशीर असतं.
उन्हाळ्यात खरबूज, टरबूज, ताक आणि दही या पदार्थांचा समावेश करा. तसेच लिंबू पाणी (Lemon water) पिल्याने शरिरातील उष्णता नियंत्रणात राहते.
सातूचे पीठ आणि डिंकाचे (Barley Flour And Gum) सेवन केल्यास शरीरात असलेल्या उष्णतेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.
दुधी आणि दोडक्यासारख्या (Calabash And Luffa) भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण असतं. ज्यामुळे पोटाला आराम मिळतो तसेच उष्णता देखील कमी होते.
रखरखत्या उन्हात वाढतीये शरीरातील उष्णता? आहारात करा 'या' पदार्थांचा समावेश!