आपल्या मेंदुला चालना मिळण्यासाठी सकस आहार हा उत्तम मानला जातो.
सध्याच्या धावपळीच्या युगात आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही.त्यामुळे आपल्यातील विसराळूपणा दिवसेंदिवस वाढत चाललाय.
म्हणून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आहारात 'या' सर्वोत्तम गोष्टींचा समावेश करा.
अक्रोड हे ओमेगा 3, फॅटी अॅसिडसचा समृध्द स्त्रोत आहे.यामध्ये आढळणारे ओमेगा-3 अॅसिड स्मरणशक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळते. या आवश्यक पोषक तत्वांमुळे मेंदू योग्यरित्या काम करतो.
माशांमध्ये आढळणाऱ्या ओमेगा-3 मुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.यासाठी माशांचा आहारात समावेश करावा.
अंड्यांमध्ये जीवनसत्त्वे बी 6 आणि बी 12 , फोलेट आणि कोलीन असतात.त्यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यासही मदत होते.
बदाम अनेक पोषक गुणांनी परिपूर्ण आहे. त्यामध्ये असणाऱ्या व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन ई, झिंक, प्रोटीनमुळे स्मरणशक्ती वाढते.