हेल्थ एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार दररोज 20 ते 30 मिनिटे उन्हात उभे राहावे. किंवा कोवळ्या उन्हात चालावे. यामुळे शरीरातील व्हिटॅमिन डी चे प्रमाण वाढते.
उन्हाळ्यात फार जास्त कडक उन्हात उभं राहू नये कारण त्यामुळे थकवा येऊन आजारी पडण्याची दाट शक्यता आहे. उन्हामुळे त्वचा भाजू शकते.
उन्हाळात अगदी 10 ते 15 मिनिटेच उन्हात उभे राहावे तर थंडीमध्ये अर्धा तास उन्हाचा आनंद घेतलात तरी चालेल
रिसर्चनुसार, थंडीमध्ये दुपारची वेळ उन्ह घेण्यासाठी मस्त आहे.
थंडीत किंवा अतिशय गार वातावरण असेल तेव्हा 12 ते 2 च्या मध्ये उन्हाचा आनंद घ्यावा.
व्हिटॅमिन डी ने परिपूर्ण असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा
लिंबू वर्गीय फळे, मशरुम, मासे, चिझ, संत्री, कोबी, अंडी यांचा समावेश करावा